022-24713283 / 24709558 mahabms55@gmail.com
भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश

भारतीय मजदूर संघाची वैशिष्ट्ये

मुख्यपृष्ठ  ›  संघाची वैशिष्ट्ये

भारतीय मजदूर संघ म्हणजे कामगारांनी कामगारांच्या करिता कामगारांद्वारे चालणारे संघटन. राष्ट्रहित, उद्योगहित व कामगारहित हेच धोरण घेऊन संपूर्ण देशभर कार्यरत आहे.

व्यक्तीपेक्षा संघटना महत्त्वपूर्ण

शोषित, पीडित, वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामगारांच्या सुख-सुविधांसाठी सतत कार्यरत असणारे समर्थ, स्वायत्त, स्वावलंबी केंद्रीय समाज संघटन. सरकारवर अंकुश ठेवणारे, परंतु राजकारणापासून अलिप्त, गैर-राजनीतिक संघटन. भारतीय मातीतले विचार, संस्कार, परंपरा, सन्मान व ज्ञानाच्या आधारावर श्रमिकांचा विकास व प्रगती करणारे संघटन.

भारतीय मजदूर संघाचा वेगळेपणा

झेंडा भगवा — भगवा झेंडा तप, तपस्या व बलिदानाचे प्रतीक. भारतीय श्रेष्ठत्व परंपरा सांगणारा भगवा ध्वज कामगार क्षेत्रात फडकतो आहे.

चक्र — चक्र हे औद्योगिकरणाचे प्रतीक आहे.

गव्हाच्या ओंब्या — शेती व समृद्धीचे प्रतीक आहे.

मूठ — संघटन शक्तीचे प्रतीक आहे. अंगठ्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांमध्ये जास्त प्रगती करतो.

विश्वकर्मा जयंती — प्राचीन काळापासून कारागीर विश्वकर्माचे वैशिष्ट्य समजून आद्य कामगार विश्वकर्मा यांना दैवत मानून अनेक जिल्ह्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये व जमशेदपूर या ठिकाणी विश्वकर्मा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतात. म्हणून १७ सप्टेंबर हा दिवस भारतीय मजदूर संघाने राष्ट्रीय श्रमिक दिन म्हणून स्वीकारला आहे.

भारतीय मजदूर संघाची घोषणा “भारत माता की जय” यामुळे कामगारांमध्ये राष्ट्रप्रेम जागे होते. “देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम।” गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे देशाचे नाव व गौरवाबरोबरच आर्थिक लाभ मिळाला पाहिजे, अशी ही घोषणा आहे.

भारतीय मजदूर संघ देशहित, उद्योगहित व कामगारहित या त्रिसूत्रीवर काम करतो. सर्व हित एकमेकांवर अवलंबून आहे. यामुळेच भारतीय मजदूर संघ देशपातळीवर एक वेगळे संघटन म्हणून देशात एक नंबरवर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय मजदूर संघात सहभाग नोंदवावा व सदस्य व्हावे, ही नम्र विनंती!

आजच सदस्य व्हा