022-24713283 / 24709558 mahabms55@gmail.com
भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश
सूचना
Welcome to Bharatiya Mazdoor Sangh, Maharashtra Pradesh
राष्ट्रहित
Industrialise the Nation
उद्योगहित
Labourise the Industry
श्रमिकहित
Nationalise the Labour
जिल्हा

जिल्ह्यातील घडामोडी

भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत वार्ता फलकाचे उद्घाटन +2
PUNE

भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत वार्ता फलकाचे उद्घाटन

07-12-2026

भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत वार्ता फलकाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत कामगार व कर्मचारी यांच्यापर्यंत संघटनेची माहिती, विविध उपक्रम, कामगारहिताचे निर्णय, शासकीय सूचना तसेच संघटनात्मक घडामोडी नियमितपणे पोहोचाव्यात या उद्देशाने वार्ता फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वार्ता फलक हा कर्मचारी व संघटना यांच्यातील प्रभावी संवादाचा दुवा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कामगारांच्या हक्कांबरोबरच त्यांच्या कर्तव्यांविषयी जनजागृती करणे, संघटनेचे विचार आणि उपक्रम अधिकाधिक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच संघटनात्मक एकात्मता दृढ करणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी, स्थानिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याचे अधिवेशन संपन्न +1
NANDED

भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याचे अधिवेशन संपन्न

08-08-2026

भारतीय मजदूर संघाची नवी कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अनुप जोंधळे, कार्याध्यक्षपदी दीपकसिंग गाडीवाले नांदेड, दि. ९ ऑगस्ट २०२६ : देशातील क्रमांक एकची कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाचे नांदेड जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नांदेड जिल्हाध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी बँकेचे अनुप जोंधळे, कार्याध्यक्षपदी एस.जी.जी.एस.मधून सेवानिवृत्त झालेले दीपकसिंग गाडीवाले, सचिवपदी वीज कंत्राटी कर्मचारी प्रदीप राठोड यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्याम मंठाळकर (वीज), राजेश वडकेरथ (रेल्वे), रवींद्र भालेराव (पोस्ट), राहुल शिंदे (महिला आर्थिक विकास मंडळ) यांची, तर सहसचिवपदी स्वप्नील शिरसे (बांधकाम), अनिल पोतदार (वीज), विश्वजीत शेंडे (वीज कंत्राटी) यांची निवड झाली. स्वाती कवठे (बँक) यांच्यावर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संघटन मंत्रीपदी संजय सुरोशे (बांधकाम), तर प्रचार-प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद देशमुख (वीज) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजमल बाकलीवाल (एलआयसी), हरिप्रसाद के.पी. (रेल्वे), निवृत्ती जोगपेठे (एस.टी.), प्रदीप देशमुख (एनआरएचएम), सुनील नरवाडे (अधिकारी), शंकर इंगोले (वीज कंत्राटी), रमा दामोदर (महिला आर्थिक विकास मंडळ), रेश्माजी काळे (बांधकाम) आणि गोविंद बोडके (कंत्राटी) यांची निवड करण्यात आली. जुन्या कार्यकारिणीचा निरोप तत्पूर्वी मावळते जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी जुन्या कार्यकारिणीचे विसर्जन करताना नव्या कार्यकारिणीला आपले पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे नवनियुक्त अध्यक्ष सुधांशू रानडे म्हणाले, “गवताची एक पाती वाकू शकते, ती हरू शकते; परंतु अनेक गवताच्या पाती एकत्र आल्यानंतर त्याचा जो दोर बनतो, तो सर्वात शक्तिमान हत्तीलाही बांधून ठेवतो. याच तत्त्वाने भारतीय मजदूर संघाचे काम सुरू आहे.” कोणत्याही क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न असोत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी तीव्र लढा उभारून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची भारतीय मजदूर संघाची कार्यपद्धती आहे. केवळ देशातच भारतीय मजदूर संघ क्रमांक एकची संघटना नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगारांच्या विविध संमेलनांमध्येही संघटनेने आपली छाप सोडली असून कामगारांचे नेतृत्व केले आहे, हा प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण असल्याचे रानडे यांनी सांगितले. आजही कोट्यवधी कामगार चांगल्या आणि सक्षम संघटनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता असलेली संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाकडे पाहिले जाते. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार तसेच वीज क्षेत्रातील कामगारांनी भारतीय मजदूर संघाचा स्वीकार करून संघटनेच्या पाठीशी उभे राहावे आणि ही शाश्वत शक्ती अधिक बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तीव्र चिंता कंत्राटी कामगारांचे धोरण देशात आणि राज्यात राबविल्यामुळे लाखो कामगारांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करून घेऊन कामगारांना असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे. वर्षानुवर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करणे हे आत्महत्येपेक्षा कमी नाही, अशी तीव्र भावना सुधांशू रानडे यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्हा भारतीय मजदूर संघाने वीज कंत्राटी कामगारांचे प्रश्न हाती घेऊन त्यांना पूर्ण वेतन बँक खात्यावर मिळावे यासाठी व्यवस्था केली. बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविताना त्यांना भांडी वाटप, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सरकारविरोधातील आक्रोश मोर्चातही सक्रिय सहभाग घेतला. संघटनेची “राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित” ही कार्यपद्धती असल्यामुळे भारतीय मजदूर संघ आज देशातील क्रमांक एकची संघटना बनली आहे, हे अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. संघटनेचा विस्तार करण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी आपल्या भाषणातून अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बांधकाम कामगार तसेच विविध उद्योगांतील कंत्राटी कामगारांसाठी नव्या युनियन उभारून भारतीय मजदूर संघाचा विस्तार करण्याचे आवाहन केले. पुढील वर्षी महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन नांदेड येथे होणार असल्याने त्यासाठी आतापासूनच मजबूत नियोजन आणि संघटनात्मक आखणी करावी,

23 जुलै ७२ ला वर्धापनदिन +3
KOLHAPUR

23 जुलै ७२ ला वर्धापनदिन

23-07-2026

घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव कोल्हापूर येथे कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ करार संपन्न कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव येथील कायम कर्मचाऱ्यांचा सन २०२५ ते सन २०२९ अखेर म्हणजेच दि. १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर खेळीमेळीच्या वातावरणात संम्पन्न झाला. गेली सहा महिने चाललेल्या वाटाघाटीस आज एक चांगले मुर्तस्वरुप प्राप्त झाले. करारातील ठळक बाबी १. हा वेतनवाढ करार रू. ६५७०/- प्रती माह दोन टप्प्यात अवलंबला जाईल. पहिला टप्पा दि. १ जुलै २०२५ ते ३० जून २०२७ अखेर प्रतिमाह रू. ३८००/- इतकी वाढ तर १ ऑगस्ट २०२७ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर प्रतिमाह रु. ६५७०/- इतकी राहिल. २. दि. १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२६ अखेरचा रु. ३८००/- ने एकूण १३ महिन्याची फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार. पहिल्या सात महिन्याचा फरक सप्टेंबर २०२६ च्या वेतनात मिळेल व राहिलेल्या सहा महिन्याचा फरक फेब्रुवारी २०२७ च्या वेतनात मिळेल. ३. निवृत्ती वेतनाचे वय ५८ वरून ६० हि कामगाराच्या वर्तणुकीवर व कामावर वाढ करण्याचे आश्वासन दिले. ४. कामगारांची शैक्षणिक पात्रता, कामातील प्रामाणिकपणा व वर्तनुक ह्यावर करण्यात येणार. त्याप्रसंगी कंपनीचे संचालक मा. श्री. आदित्य किरण पाटील , मुख्य व्यवस्थापक मा. श्री. राव साहेब, कामगार अधिकारी श्री. सचिन भोसले, श्री. विनायक भारती, भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ अध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, जेष्ठ पदाधिकारी श्री. मुकुंद जोशी, जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र एडके, जिल्हा सचिव श्री प्रविण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. तेजेस मडिवाल , श्री. महाडिक, श्री. उत्तम कांबळे व पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. करारावर उभय दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या सह्या झाल्यावर कंपनीच्या गेटवर भव्य द्वारसभा घेण्यात आली. त्यावेळी श्री. तेजेस मडिवाल व श्री एस. एन. पाटील ह्यांनी उपस्थित कामगार वर्गाला करारातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून कामगार वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.

सर्व जिल्हे
कार्यक्रम

महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. +1
05-08-2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत 'वर्षा' शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे भारतीय मजदूर संघाच्या (BMS) प्रतिनिधी मंडळाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गत १६ एप्रिल रोजी भारतीय मजदूर संघाद्वारे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या निवेदनावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. मजदूर संघाच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीतील प्रमुख चर्चा आणि मागण्या: * नवीन कामगार कायदे (लेबर कोड): बैठकीत भारतीय मजदूर संघाची लेबर कोडविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडण्यात आली. या लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द कराव्यात आणि जे कामगार या कायद्याच्या कक्षेतून बाहेर जात आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली. * प्रमुख मागण्या: ◦ राज्यात ESI (कामगार राज्य विमा) योजना अत्यंत प्रभावीपणे राबवावी. ◦ बोनस मर्यादा वाढवून ४२,००० रुपये करावी. ◦ राज्य सरकार अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा. ◦ कामगार कपात नुकसान भरपाई ६० दिवस करावी. ◦ EPS पेन्शनधारकांना २,००० रुपये पेन्शन देण्यात यावी. ◦ विश्वकर्मा जयंती अधिकृतपणे शासकीय सण म्हणून घोषित करावी. ◦ विडी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे. ◦ राज्यातील कामगार विषयक समित्या व मंडळ त्वरित स्थापन करा त्यात BMS ला योग्य प्रतिनिधीत्व द्या. ◦ माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळातील कोर्ट केसेस दिवाणी न्यायालयाऐवजी (Civil Court) कामगार न्यायालयातच चालवण्याबाबत आवश्यक तो बदल करावा. ◦ तसेच घरेलु कामगार, बांधकाम, आशा सेविका, फेरीवाले, अंगणवाडी सेविका, वीज कामगार महासंघ, वीज कंत्राटी कामगार, एअरपोर्ट टॅक्सी चालक, इंडियन एअरलाइन रोजंदारी कामगार, लिपिक संघ, एसटी महामंडळ, सुरक्षा रक्षक यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेन्शन, बचत गट संस्था निधी आणि मेट्रो कामगार आदी विविध क्षेत्रातील प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद: माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक वातावरणात झालेल्या या चर्चेदरम्यान खालीलप्रमाणे आश्वासने दिली: * बोनस मर्यादा ४२००० रुपये करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल. * कामगार राज्य विमा योजनेबाबत (ESI) लवकरच एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल. * विश्वकर्मा जयंती आणि इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. * शासन स्तरावर अंतर्गत बैठक घेऊन भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींसोबत लवकरच पुन्हा चर्चा केली जाईल. * वीज उद्योगातील प्रश्नांवरही लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल. • या बैठकीस भारतीय मजदूर संघाच्या वतीने अखिल भारतीय सेक्रेटरी ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगिर, विदर्भ महामंत्री श्री. गजानन गटलेवार आणि सह क्षेत्र संघटन मंत्री श्री. मोहन येणुरे हे उपस्थित होते. तसेच, शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. श्रीकर परदेशी, श्री. महेश पोहणेरकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा +3
23-07-2026

भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; भव्य कामगार मेळावा संपन्न पुणे, दि. २३ जुलै २०२६ : भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने भारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लेडी रमाबाई हॉल, एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध उद्योगांतील उद्योगप्रमुख, सभासद, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह उत्साहाने भरून गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व भारतमाता, विश्वकर्मा भगवान आणि पूजनीय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर जिल्ह्याचे सचिव श्री. सागर पवार यांनी मागील वर्षभरात भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याने विविध उद्योगांमध्ये केलेल्या संघटनात्मक कार्याचा, वेतनवाढ करारांचा, नवीन युनिट स्थापनेचा, सदस्य नोंदणीचा, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राबविलेल्या आंदोलनांचा व विविध उपक्रमांचा सविस्तर वृत्तनिवेदन सादर केले. या अहवालातून जिल्ह्यातील संघटनात्मक वाढ, कामगारहितासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आगामी वाटचालीची दिशा उपस्थितांसमोर मांडण्यात आली. या मेळाव्यास भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष मा. सुधांशू रानडे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. तृप्तीताई आळती, पूर्व अखिल भारतीय महामंत्री मा. रवींद्र हिंमते, पुणे जिल्हाध्यक्ष मा. अर्जुन चव्हाण, जिल्हा सचिव श्री. सागर पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा. वंदनाताई कामठे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर जाधव, तसेच विराज टिकेकर, हरी सोनी, विवेक ठकार, राजेंद्र जोशी, मनोज भदारके, गणेश टिंगरे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, उद्योगप्रमुख, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना मा. सुधांशू रानडे यांनी भारतीय मजदूर संघाचा गौरवशाली इतिहास, संघटनेची वैचारिक भूमिका, कामगार चळवळीची वाटचाल आणि भविष्यातील आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मा. तृप्तीताई आळती यांनी आपल्या जपान दौऱ्यातील अनुभव कथन करताना भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली विश्वासार्हता, जागतिक कामगार चळवळीतील अनुभव आणि भारतीय मजदूर संघाच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान विविध उद्योगांतील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात संघटन, समर्पण आणि कामगार ऐक्याचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मनोज भदारके यांनी केले, तर जनार्दन शिवारकर यांनी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. "राष्ट्रहित – उद्योगहित – कामगारहित" या भारतीय मजदूर संघाच्या ध्येयवाक्याचा पुनरुच्चार करत, कामगारांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचा हा ७२ वा वर्धापन दिन मेळावा संघटनशक्ती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कामगार ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडविणारा ठरला.

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!* +1
15-07-2026

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!*

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर! बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व एजंटांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार!....प्रदेशाध्यक्ष श्री हरी चव्हाण बोगस आरोग्य तपासणी व वस्तू रुपी लाभ बंद बांधकाम मंडळ सचिव यांच्याशी बांधकाम महासंघ पदाधिकाऱ्यांची चर्चा १५ जुलै २०२६ भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या 'बांधकाम कामगार महासंघ, महाराष्ट्र प्रदेश'च्या वतीने बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आणि ज्वलंत मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. विवेक कुंभार यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीत महासंघाने मांडलेल्या विविध ११ प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, शासन आणि मंडळ यांच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहीती बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, सरचिटणीस रविंद्र माने यांनी दिली.​​ महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच सामाजिक सुरक्ष संहिता २०२० च्या अंतर्गत नवीन बदल व बोगस भ्रष्ट्राचारी योजनांमधून होणारी मंडळाच्या निधीची लूट तत्काल थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी मंडळ सचिव यांच्या जवळ भारतीय मजदूर संघाने बैठकीची मागणी केल्याच्या अनुषंगाने आज दिनांक १५ जुलै २०२६ रोजी बांधकाम मंडळाच्या मुख्य कार्यालयात बांद्रा मुंबई येथे महासंघाच्या पदाढीकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सचिव स्तरावरील बैठकीस भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुधांशु रानडे, महासंघाचे अध्यक्ष हरी चव्हाण, सरचिटणीस रविंद्र माने, असंघटित क्षेत्र प्रभारी श्रीपाद कुटासकर, महासंघ उपाध्यक्ष विकास सुतार हे उपस्थित होते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तातडीने पुनर्गठन करण्याच्या महासंघाच्या पहिल्या प्रमुख मागणीवर शासन पातळीवर सदर मंडळाच्या वैधानिक पुनर्गठनाची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती सचिव यांनी दिली. बांधकाम कामगारांना भांडी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच हे वस्तू रूप लाभ बंद करण्यात आले असून, या पूर्वी या वस्तुरूपी लाभासाठी ऑनलाइन मागणी अर्ज सादर केलेले आहेत त्यांना सदर लाभ देण्याच्या महासंघाच्या मागणीस सचिवांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यापुढे कामगारांच्या हक्काचे लाभ रोख रक्कमेच्या स्वरूपात थेट 'डीबीटी' द्वारे बँक खात्यात जमा होणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या सनियंत्रण समितीला उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने, न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.  बोगस आरोग्य तपासणीची व कौशल्य विकास प्रशिक्षण घोटाळ्याची चौकशी होणार कंत्राटदार कंपन्यांमार्फत राबवली जाणारी कथित बोगस आरोग्य तपासणी योजना आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या संदर्भात आलेल्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल व कौशल्य विकास योजनेअंतर्गत झालेल्या कथित बोगस प्रशिक्षणाची तक्रारींनुसार सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी कंत्राटदारांची देयके (बिल) रोखली जातील असे सचिवांनी स्पष्ट केले. नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ९० दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्राबाबत कामगारांना दिलासा देणारा निर्णय शासन स्तरावर लवकरच घेण्यात येईल. भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व एजंटगिरीला चाप बसणार जिल्हा सुविधा केंद्रात चालणारी बेकायदेशीर एजंटगिरी आणि काही अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती यावर प्रश्न उपस्थित केला असता, संबंधित एजंट व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये बांधकाम मंडळाशी संबंधित नोंदणी व नूतनीकरणाची कामे विहित कालमर्यादेत व्हावीत यासाठी तातडीने कडक कार्यवाही केली जाणार आहे. नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने मंडळाने जारी केलेल्या सुधारित योजनांबाबत (शैक्षणिक सहाय्य, वैद्यकीय मदत इ.) महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  फौजदारी गुन्हे दाखल होणार मंडळाची फसवणूक करून बोगस नोंदणी करणाऱ्या कामगारांवर आणि बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या एजंटांवर तसेच बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या ठेकेदारांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्याच प्रमाणे यापुढे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड/ओळखपत्र घेण्यासाठी आता जिल्हा सुविधा केंद्रात जाण्याची गरज उरलेली नाही. ही ओळखपत्रे आता थेट तालुका सुविधा केंद्रातच उपलब्ध करून दिली जातील. नूतनीकरणाच्या प्रक्रियेत कामगारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी यापुढे नूतनीकरणासाठी कोणत्याही विशिष्ट अपॉइंटमेंट पत्राची गरज भासणार नाही या दृष्टीने योग्य ते बदल केले जाणार आहेत. मंडळ सचिव स्तरावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेले बैठकिच्या अनुषंगाने झालेल्या निर्णयांची अधिक माहिती घेण्यासाठी तसेच भांडी संच,सुरक्षा संच, अत्यावश्यक संच मिळण्याच्या दृष्टीने ज्या बांधकाम कामागरांनी ऑनलाइन मागणी अर्ज केलेल्या आहेत. त्यांनी त्या त्या जिल्ह्यात भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्याशी व मजदूर संघ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन हरी चव्हाण व रविंद्र माने यांनी केले.

सर्व घडामोडी
मनोगत

प्रेरणास्थान

श्री दत्तोपंत ठेंगडी

श्री दत्तोपंत ठेंगडी

संस्थापक, भारतीय मजदूर संघ

“ सृष्टीचा निर्माता, इंद्रप्रस्थ, द्वारिका आदी विविध नगरांची निर्मिती करणारा आपल्या देशातील श्रमिकांचा पूर्वज भगवान विश्वकर्मा यांचे आपल्या संस्कृतीतील व समाजातील स्थान अनन्यसाधारण असे आहे. ”

गॅलरी

आमची छायाचित्रे

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!* बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!* बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!* बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासकीय मंजुरीची मोहर!* विषय : कंत्राटदारविरहित रोजगार योजनेबाबत शासनाच्या अभ्यास गटाची पहिली बैठक संपन्न; भारतीय मजदूर संघाकडून सविस्तर निवेदन सादर  महाराष्ट्र राज्यात हरियाणा राज्यातील हरियाणा कौशल्य रोजगार निगम (HKRN) च्या धर्तीवर कंत्राटदारविरहित रोजगार योजना लागू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाची पहिली बैठक आज (दि. १५ जुलै २०२६) कामगार आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. विषय : कंत्राटदारविरहित रोजगार योजनेबाबत शासनाच्या अभ्यास गटाची पहिली बैठक संपन्न; भारतीय मजदूर संघाकडून सविस्तर निवेदन सादर महाराष्ट्र राज्यात हरियाणा राज्यातील हरियाणा कौशल्य रोजगार निगम (HKRN) च्या धर्तीवर कंत्राटदारविरहित रोजगार योजना लागू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाची पहिली बैठक आज (दि. १५ जुलै २०२६) कामगार आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन प्रदेशाध्यक्ष सुधांशू रानडे : भारतीय मजदूर संघाचा मेळाव्यात कामगारांच्या प्रश्नांवर झाले विचारमंथन भारतीय श्रम शोध मंडळ - परिसंवाद विकसित भारतासाठी सक्षम व  समृद्ध कामगार वर्ग उभारण्यात संशोधनाची भूमिका   The role of research in building an empowered and prosperous workforce for developed Indi भारतीय श्रम शोध मंडळ - परिसंवाद विकसित भारतासाठी सक्षम व समृद्ध कामगार वर्ग उभारण्यात संशोधनाची भूमिका The role of research in building an empowered and prosperous workforce for developed Indi
संपूर्ण गॅलरी पहा