भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत वार्ता फलकाचे उद्घाटन
07 Dec 2026pune
भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत वार्ता फलकाचे उद्घाटन
भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा शाखेत कामगार व कर्मचारी यांच्यापर्यंत संघटनेची माहिती, विविध उपक्रम, कामगारहिताचे निर्णय, शासकीय सूचना तसेच संघटनात्मक घडामोडी नियमितपणे पोहोचाव्यात या उद्देशाने वार्ता फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वार्ता फलक हा कर्मचारी व संघटना यांच्यातील प्रभावी संवादाचा दुवा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कामगारांच्या हक्कांबरोबरच त्यांच्या कर्तव्यांविषयी जनजागृती करणे, संघटनेचे विचार आणि उपक्रम अधिकाधिक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच संघटनात्मक एकात्मता दृढ करणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमास भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी, स्थानिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड, दि. ९ ऑगस्ट २०२६ : देशातील क्रमांक एकची कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाचे नांदेड जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नांदेड जिल्हाध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी बँकेचे अनुप जोंधळे, कार्याध्यक्षपदी एस.जी.जी.एस.मधून सेवानिवृत्त झालेले दीपकसिंग गाडीवाले, सचिवपदी वीज कंत्राटी कर्मचारी प्रदीप राठोड यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी श्याम मंठाळकर (वीज), राजेश वडकेरथ (रेल्वे), रवींद्र भालेराव (पोस्ट), राहुल शिंदे (महिला आर्थिक विकास मंडळ) यांची, तर सहसचिवपदी स्वप्नील शिरसे (बांधकाम), अनिल पोतदार (वीज), विश्वजीत शेंडे (वीज कंत्राटी) यांची निवड झाली. स्वाती कवठे (बँक) यांच्यावर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
संघटन मंत्रीपदी संजय सुरोशे (बांधकाम), तर प्रचार-प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद देशमुख (वीज) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजमल बाकलीवाल (एलआयसी), हरिप्रसाद के.पी. (रेल्वे), निवृत्ती जोगपेठे (एस.टी.), प्रदीप देशमुख (एनआरएचएम), सुनील नरवाडे (अधिकारी), शंकर इंगोले (वीज कंत्राटी), रमा दामोदर (महिला आर्थिक विकास मंडळ), रेश्माजी काळे (बांधकाम) आणि गोविंद बोडके (कंत्राटी) यांची निवड करण्यात आली.
जुन्या कार्यकारिणीचा निरोप
तत्पूर्वी मावळते जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी जुन्या कार्यकारिणीचे विसर्जन करताना नव्या कार्यकारिणीला आपले पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे नवनियुक्त अध्यक्ष सुधांशू रानडे म्हणाले, “गवताची एक पाती वाकू शकते, ती हरू शकते; परंतु अनेक गवताच्या पाती एकत्र आल्यानंतर त्याचा जो दोर बनतो, तो सर्वात शक्तिमान हत्तीलाही बांधून ठेवतो. याच तत्त्वाने भारतीय मजदूर संघाचे काम सुरू आहे.”
कोणत्याही क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न असोत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी तीव्र लढा उभारून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची भारतीय मजदूर संघाची कार्यपद्धती आहे. केवळ देशातच भारतीय मजदूर संघ क्रमांक एकची संघटना नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगारांच्या विविध संमेलनांमध्येही संघटनेने आपली छाप सोडली असून कामगारांचे नेतृत्व केले आहे, हा प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण असल्याचे रानडे यांनी सांगितले.
आजही कोट्यवधी कामगार चांगल्या आणि सक्षम संघटनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता असलेली संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाकडे पाहिले जाते. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार तसेच वीज क्षेत्रातील कामगारांनी भारतीय मजदूर संघाचा स्वीकार करून संघटनेच्या पाठीशी उभे राहावे आणि ही शाश्वत शक्ती अधिक बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तीव्र चिंता
कंत्राटी कामगारांचे धोरण देशात आणि राज्यात राबविल्यामुळे लाखो कामगारांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करून घेऊन कामगारांना असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे. वर्षानुवर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करणे हे आत्महत्येपेक्षा कमी नाही, अशी तीव्र भावना सुधांशू रानडे यांनी व्यक्त केली.
नांदेड जिल्हा भारतीय मजदूर संघाने वीज कंत्राटी कामगारांचे प्रश्न हाती घेऊन त्यांना पूर्ण वेतन बँक खात्यावर मिळावे यासाठी व्यवस्था केली. बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविताना त्यांना भांडी वाटप, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सरकारविरोधातील आक्रोश मोर्चातही सक्रिय सहभाग घेतला. संघटनेची “राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित” ही कार्यपद्धती असल्यामुळे भारतीय मजदूर संघ आज देशातील क्रमांक एकची संघटना बनली आहे, हे अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटनेचा विस्तार करण्याचे आवाहन
भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी आपल्या भाषणातून अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बांधकाम कामगार तसेच विविध उद्योगांतील कंत्राटी कामगारांसाठी नव्या युनियन उभारून भारतीय मजदूर संघाचा विस्तार करण्याचे आवाहन केले.
पुढील वर्षी महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन नांदेड येथे होणार असल्याने त्यासाठी आतापासूनच मजबूत नियोजन आणि संघटनात्मक आखणी करावी,
KOLHAPUR
23 जुलै ७२ ला वर्धापनदिन
23 Jul 2026कोल्हापुर
घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव कोल्हापूर येथे कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ करार संपन्न
कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव येथील कायम कर्मचाऱ्यांचा सन २०२५ ते सन २०२९ अखेर म्हणजेच दि. १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर खेळीमेळीच्या वातावरणात संम्पन्न झाला. गेली सहा महिने चाललेल्या वाटाघाटीस आज एक चांगले मुर्तस्वरुप प्राप्त झाले.
करारातील ठळक बाबी
१. हा वेतनवाढ करार रू. ६५७०/- प्रती माह दोन टप्प्यात अवलंबला जाईल. पहिला टप्पा दि. १ जुलै २०२५ ते ३० जून २०२७ अखेर प्रतिमाह रू. ३८००/- इतकी वाढ तर १ ऑगस्ट २०२७ ते ३१ डिसेंबर २०२९ अखेर प्रतिमाह रु. ६५७०/- इतकी राहिल.
२. दि. १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२६ अखेरचा रु. ३८००/- ने एकूण १३ महिन्याची फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार. पहिल्या सात महिन्याचा फरक सप्टेंबर २०२६ च्या वेतनात मिळेल व राहिलेल्या सहा महिन्याचा फरक फेब्रुवारी २०२७ च्या वेतनात मिळेल.
३. निवृत्ती वेतनाचे वय ५८ वरून ६० हि कामगाराच्या वर्तणुकीवर व कामावर वाढ करण्याचे आश्वासन दिले.
४. कामगारांची शैक्षणिक पात्रता, कामातील प्रामाणिकपणा व वर्तनुक ह्यावर करण्यात येणार.
त्याप्रसंगी कंपनीचे संचालक मा. श्री. आदित्य किरण पाटील , मुख्य व्यवस्थापक मा. श्री. राव साहेब, कामगार अधिकारी श्री. सचिन भोसले, श्री. विनायक भारती, भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघ अध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, जेष्ठ पदाधिकारी श्री. मुकुंद जोशी, जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र एडके, जिल्हा सचिव श्री प्रविण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. तेजेस मडिवाल , श्री. महाडिक, श्री. उत्तम कांबळे व पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. करारावर उभय दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या सह्या झाल्यावर कंपनीच्या गेटवर भव्य द्वारसभा घेण्यात आली. त्यावेळी श्री. तेजेस मडिवाल व श्री एस. एन. पाटील ह्यांनी उपस्थित कामगार वर्गाला करारातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले. फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून कामगार वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.